निद्रानाशाची लक्षणे काय आहेत ?
निद्रानाशाच्या लक्षणांमध्ये रात्री झोप न लागणे, रात्री लवकर उठणे, खूप लवकर जागे होणे, रात्रीच्या झोपेनंतरही दिवसा थकवा जाणवणे, यामुळे चिडचिड, नैराश्य, कामांवर लक्ष केंद्रित न करता येणे आदी लक्षणे दिसून येतात.
निद्रानाशासाठी जोखीम घटक कोणते आहेत ?
जवळजवळ प्रत्येक व्यक्ती कधीकधी झोपत नाही. जर तुम्ही स्त्री असाल तर याचा धोका वाढतो. कारण, मासिक पाळी आणि रजोनिवृत्ती दरम्यान होणाऱ्या हार्मोनल बदलामुळे असे होऊ शकते. गर्भधारणेच्या दरम्यान निद्रानाश सामान्य आहे. तुमचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असल्यास, झोपेच्या पद्धतींमध्ये बदल आणि निद्रानाश होतो. तुम्हाला कोणताही मानसिक आरोग्य विकार किंवा आजार असल्यास, तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो.
निद्रानाशाची गुंतागुंत काय आहे ?
योग्य आहार आणि नियमित व्यायाम एवढेच झोप आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. निद्रानाशाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. निद्रानाशाने ग्रस्त लोकांच्या जीवनाची गुणवत्ता सामान्यतः चांगली झोप घेणाऱ्या लोकांपेक्षा कमी असते. झोपेच्या कमतरतेच्या गुंतागुंतांमध्ये कामात लक्ष न लागणे, शैक्षणिक दर्जा घसरणे आणि वाहन चालवित असताना अचानक डुलकी लागून अपघात होण्याचा धोका वाढतो. याशिवाय, मानसिक आरोग्याचे विकार जसे की नैराश्य, तणाव, माद्यक पदार्थांचे सेवनाचे विकार वाढल्याचेही दिसून येते. निद्रानाशाच्या रुग्णांना उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा होण्याचीही शक्यता असते.
वृद्धत्वाचा झोपेच्या पद्धतींवर त्रास कसा परिणाम होतो ?
वाढत्या वयानुसार झोप कमी होणे हे सामान्य आहे. जसजसे वय वाढते तसतसे झोपेच्या पद्धतींमध्ये बदल होवू शकतात. संधिवात किंवा नैराश्य किंवा पाठदुखी किंवा चिंता यासारखे आरोग्यातील बदल झोपेमध्ये व्यत्यय आणू शकतात. रात्रीच्या वेळी वारंवार लघवी लागण्यामुळेही झोपेवर याचा परिणाम होऊ शकतो. ‘ऑब्सट्रक्टिव स्लीप ॲपनिया’ आणि ‘रेस्टलेस लेग्स सिंड्रोम’ वृद्धांच्या झोपेमध्ये व्यत्यय आणू शकतात.
रात्री चांगली झोप कशी घ्यावी ?
झोपेबाबत चांगल्या सवयी लावा. विशेषतः झोपण्याची व उठण्याची वेळ कायम ठेवा. सक्रिय रहा आणि नियमित शारीरिक गतिविधी वाढवा. दुपारची झोप टाळा किंवा मर्यादित करा, कॅफीन आणि अल्कोहोल टाळा किंवा मर्यादित करा, निकोटिन वापरू नका. रात्री तुमचा स्क्रीन वेळ कमी करा.
झोपेच्या कमतरतेवर उपचार काय आहे ?
रात्री ८ वाजेनंतर स्क्रीन टाइम टाळावा, तणाव, वैद्यकीय परिस्थिती आणि काही औषधांमुळे निद्रानाश होऊ शकतो, त्यावर उपाय करा. काही लोक मेलाटोनिन, व्हॅलेरियन, अॅक्युपंक्चर, योग किंवा ध्यान करण्याचा प्रयत्न करतात. यावर त्यांचे त्यांचे परिणाम असू शकतात.
संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी म्हणजे काय ?
हे झोपेच्या औषधांपेक्षा अधिक प्रभावी आहे. ही थेरपी तुम्हाला नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवण्यास किंवा दूर करण्यात मदत करते. या उपचारासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांची मदत घेऊ शकता. काही प्रकरणांमध्ये झोपेच्या गोळ्यांची शिफारस केली जाऊ शकते. तथापि, ते सवयी बनू शकतात आणि वृद्धांना धोका निर्माण करू शकतात.