Site icon sunflower hospital nagpur

पॅन्क्रिएटिक कॅन्सरच्या बाबतीत माहिती जाणून घ्या!

पेन्क्रियाज कॅन्सरची लक्षणे कोणती ?

पॅन्क्रियाज कॅन्सरचे निदान प्रारंभिक अवस्थेत कमीच होते. सुरुवातीला या आजाराचे निदान झाल्यास उपचार यशस्वीरीत्या होऊ शकतो. या आजाराचा प्रसार शरीराच्या विविध अवयवात झाल्यानंतरच लक्षणे दिसून येतात. या कॅन्सरच्या लक्षणांमध्ये पोटाचे दुखणे असू शकते. हे दुखणे हात वा पाठीपर्यंत पसरते. भूक न लागणे, वजन कमी होणे आणि कावीळची लक्षणेही दिसू शकतात. या आजारात शरीराला खाज सुटते. कावीळसह मलाचा रंग फिक्कट होऊ शकतो.

न्य महत्त्वपूर्ण लक्षणे कोणती ?

पॅन्क्रियाज हा पाचन तंत्राशी संबंधित अवयव आहे. त्यामुळे अन्न पचनात मदत होते. तो रक्तातील साखरेच्या नियंत्रणासाठी इन्सुलिन व ग्लूकागनचा स्त्राव करते. पैन्क्रियाज कॅन्सरमध्ये लघवीचा रंग डार्क असतो. खाज, कमजोर, थकवा, हातपायाचे दुखणे, सूज असू शकते. मधुमेह नियंत्रणात न आल्यास या कॅन्सरची शक्यता असू शकते.

पैन्क्रियाज कॅन्सर वाढण्याची कारणे कोणती ?

या प्रकारातील कॅन्सर वाढण्याच्या कारणांमध्ये धूम्रपान, टाइप-२ डायबिटीज मेलेटस, पॅन्क्रियाजवर अनेक दिवसांपर्यंत असलेली सूज आदींचा समावेश आहे. डीएनएमध्ये होणाऱ्या बदलामुळेही कॅन्सरचा धोका वाढू शकतो. यामध्ये बीआरसीएर जीनमध्ये बदल, पॅन्क्रियाज कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास, जास्त वय, अनेक काळापर्यंत दारूचे सेवन आदींचा समावेश आहे.

पॅन्क्रियाज कॅन्सरची जटिलता कोणती ?

पॅन्क्रियाजचा कॅन्सर झाल्यानंतर भूक कमी लागते आणि उलटी होऊ शकते. पॅन्क्रिएटिक रसाचा स्त्राव कमी असल्याने वजन कमी होऊ शकते. पित्तनळीत अडथळा आल्याने कावीळ होऊ शकते. या कॅन्सरमध्ये स्वादुपिंडाच्या नसांचा समावेश असल्याने दुखणे गंभीर होऊ शकते. हा कॅन्सर लहान आतड्याचा पहिला भाग ड्यूडेनमला अडथळा करू शकतो. छोट्या आतड्यात पचलेल्या अन्नाच्या मार्गातही अडथळा आणू शकतो.

पॅन्क्रिएटिक कॅन्सरच्या निदानात परीक्षण कोणती ?

पॅन्क्रिएटिक कॅन्सरच्या निदानासाठी इमेजिंग परीक्षणांमध्ये अल्ट्रासाउंड परीक्षा, सिटी स्कॅन, एमआरआय स्कॅन आणि कधीकधी पीईटी स्कॅन करण्यात येते. ईयूएस नामक एन्डोस्कोपशी जुळलेले अल्ट्रासाउंड उपयोगी होऊ शकते. ईयूएसदरम्यान तपासणी आणि निदानसाठी पॅन्क्रियाजच्या ऊतकांचा एक छोटासा नमुना घेतला जाऊ शकतो. रक्ताचे परीक्षण करण्यात येऊ शकते. सीए १९-९ एक रक्त परीक्षण असून, त्याचा उपयोग बहुतांशवेळी या उद्देशाने केला जातो. वंशानुगत डीएनए परिवर्तन पाहण्यासाठी लाळ वा रक्ताचा उपयोग करून आनुवंशिक परीक्षण करण्यात येते.

पॅन्क्रिएटिक कॅन्सरच्या उपचाराचे विकल्प काय ?

या आजारातील उपचार कॅन्सरचा टप्पा आणि प्रसारावर अवलंबून असते. हा कॅन्सर आसपासच्या अवयवयांपर्यंत पसरू नये म्हणून सर्जरीद्वारे उपचार केला जाऊ शकतो. रेडिएशन आणि किमोथेरेपीसुद्धा केली जाऊ शकते. इम्युनोथेरेपी कॅन्सर कोशिकांशी लढण्यासाठी आपल्या प्रतिरक्षा प्रणालीला नियंत्रित करते.

पॅन्क्रिएटिक कॅन्सरच्या धोक्याला कमी करण्याची कारणे ?

मद्यपान आणि धूम्रपान वर्ज, नियमित व्यायाम आणि लठ्ठ असल्यास वजन कमी करणे, या महत्त्वपूर्ण पैलूंवर भर द्यावा लागतो. कुटुंबाचा इतिहास कॅन्सरचा असेल तर जास्त लक्ष दिले पाहिजे. प्रारंभिक लक्षणांच्या बाबतीत जागरूक असणे आवश्यक आहे.

Exit mobile version