क्यूट ब्राँकायटिस’ची सामान्य लक्षणे कोणती ?
प्रत्येक व्यक्तीमध्ये ‘ब्राँकायटिस’ची वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे असू शकतात. कोरडा खोकला आणि त्यानंतर ठसे पडणे, ही सुरुवातीची लक्षणे आहेत. डोकेदुखी, अंगदुखी, सौम्य ताप, थकवा, नाक वाहणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे, ही सुद्धा लक्षणे आहेत. अनेकांना डोळ्यांत पाणी येणे आणि छातीत घरघर येण्याची समस्या होऊ शकते.
‘अक्यूट ब्राँकायटिस’ कशामुळे होतो ?
अक्यूट (तीव्र) ब्राँकायटिस सहसा व्हायरल संसर्गामुळे होतो. या विषाणूमुळे सर्दी आणि खोकलाही होतो. जिवाणूचा संसर्ग, श्वसनाद्वारे शरीरात प्रवेश करणारे भौतिक आणि रासायनिक घटक, तीव्र धूर, तंबाखूचा धूर हे सुद्धा कारणीभूत ठरतात.
त्याचे निदान कसे होते ?
पूर्ण शारीरिक तपासणीनंतर काही चाचण्या करणे आवश्यक ठरतात. यामध्ये ‘कंप्लीट ब्लड काउंट’, ‘पल्स ऑक्सिमेट्री’द्वारे ऑक्सिजनची पातळी तपासणे, थुकी आणि ‘कल्चर’ची तपासणी आणि काही प्रकरणांमध्ये ‘पल्मोनरी फंक्शन टेस्ट’ देखील केली जाते.
उपचार कसे केले जातात ?
ब्राँकायटिस हा एक सामान्य आजार आहे. यामुळे गुंतागुंत होत नाही. गुंतागुंत न होता लक्षणे स्वतःच बरी होऊ शकतात. विषाणूजन्य संसर्ग असल्याने ‘अॅण्टीबायोटिक्स’ औषधांची गरज पडत नाही. परंतु त्याचे रुपांतर न्यूमोनियामध्ये झाल्यास किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गाचा संशय असल्यास, ‘अॅण्टीबायोटिक्स’ दिली जाते. यावरील उपाययोजनांमध्ये धुराचा संपर्क टाळणे, द्रवपदार्थाचे सेवन वाढविणे आणि धूम्रपान सोडणे यांचा समावेश होतो. तापासाठी पॅरासिटामॉल वापरले जाऊ शकते आणि ‘अँटीहिस्टामाइन्स’ टाळले जाते. कारण यामुळे ठसे कोरडे होऊन खोकला वाढण्याची शक्यता असते.
क्रॉनिक ब्राँकायटिस म्हणजे काय ?
यामध्ये कफ असलेला खोकला तीन महिने टिकतो आणि खोकला किमान दोन वर्षापर्यंत राहू शकतो. ही एक गंभीर स्थिती आहे. ज्यामुळे अनेकदा श्वास घेण्यास त्रास होतो आणि ‘सीओपीडी’चा देखील धोका होऊ शकतो.
डॉक्टरांकडे केव्हा जावे ?
आठवड्यांपेक्षा खोकला तीन जास्त काळ असेल, खोकल्यामुळे झोपेत अडथळा येत असेल, १०० डिग्री फॅरेनहाइटपेक्षा जास्त ताप राहत असेल, ठशांच्या रंगात बदल असेल, ठशामध्ये रक्त येत असेल आणि श्वास घेतांना छातीतून घरघर आवाज येत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ब्राँकायटिसचा धोका कसा टाळायचा ?
सिगारेटच्या धुरापासून स्वतःला दूर ठेवा, ‘फ्लू’च्या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी वर्षातून एकदा लसीकरण करा, फुफ्फुसाचे व्यायाम करा. दररोज चालल्याने फुफ्फुसांची प्रतिकारशक्ती वाढू शकते. व्हायरल इन्फेक्शनचा प्रसार रोखण्यासाठी मास्क घाला. वारंवार हात धुवा, जर तुम्हाला ‘सीओपीडी’ असेल तर तुम्ही मास्क घालायलाच हवा. विशेषतः प्रवास करताना धूळ आणि धुराच्या संपर्कात येत असल्यास मास्क गरजेचे आहे.