लठ्ठपणा आणि आहाराचा कर्करोगाशी संबंध आहे का ?
लठ्ठपणामुळे येणाऱ्या सुजेमुळे होणारे हार्मोनल बदल आणि त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतो. हा कोलोरेक्टल कर्करोगासाठी एक बदलही असू शकतो. रिफाइंड साखरेच्या सेवनाने पोटात सूज येऊ शकते आणि त्यामुळे कर्करोगाची शका वाढू शकते.
कर्करोगाच्या घटनांमध्ये अचानक वाढ होत आहे का ?
वाढती जागरूकता आणि तातडीचे निदान हे याचे मुख्य कारण आहे. भारतात सर्वसामान्यपणे स्तन, डोकं व मान, फुफ्फुस, कोलोरेक्टल आणि पोटाचा कर्करोग आढळून येतो.
का वाढत आहेत कर्करोगाच्या घटना ?
उत्तम निदान साधनांच्या माध्यमातून कर्करोगाची तपासणी केली जाते. धूम्रपान आणि मद्याचे अधिक सेवन हे मोठे कारण आहे. शहरी युवांमध्ये वेपिंग, ई-सिगारेटचे व्यसन वेगाने वाढत आहे. ग्रामीण भागात विडी पिल्याने कर्करोग अनेक पटींनी वाढतो. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हे तोंडाच्या कर्करोगाचे मुख्य कारण आहे. उशिरा लग्न व गर्भधारणा, मद्य आणि धूम्रपान तसेच व्यायामाच्या अभावामुळे शहरी महिलांमध्ये स्तन आणि ओव्हेरियन कर्करोगाच्या घटना वाढतात. दरवर्षी वाढणारे प्रदूषण हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या घटना अनेक पटीने वाढत आहेत.
टीकाकरणाने फायदा होतो का ?
ह्युमन पॅपिलोमा विषाणू व्हॅक्सिनमुळे सव्र्हायकल कर्करोगाची शक्यता कमी होते. हेपेटायटिस बी विषाणूच्या टीकाकरणाने या विषाणूमुळे होणाऱ्या यकृताच्या कर्करोगाला प्रतिबंध घालू शकतो.
बचावासाठी काय केले जाऊ शकते ?
मद्याचे सेवन करू नये, धूम्रपान बंद करावे आणि फळे व भाज्यांचे भरपूर सेवन करावे आणि वजन नियंत्रित ठेवावे. मधुमेह आजार नियंत्रित ठेवावा आणि त्यावर प्रभावीपणे उपचार करावा. किमान आठ तासांची झोप घ्यावी. मुलाचा उशिरा जन्म आणि कमी वयातच मासिक पाळी येणे, स्तनपान न करणे आणि फास्ट फूडचे अत्याधिक सेवन, गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन आणि पर्यावरणीय विषाणूजन्य पदार्थांच्या संपर्कात येत राहिल्याने कर्करोगाचा धोका वाढतो.
कर्करोगाच्या धोक्याचे आकलन कसे करावे ?
कर्करोगाचे लक्षणे मूत्र, मल किंवा थुकीत दिसून येऊ शकतात. रजोनिवृत्तीनंतर होणारा रक्तस्राव गर्भाशयाच्या कर्करोगामुळे होऊ शकतो. विनाकरण वजन कमी होणे, अॅनिमिया, भूक कमी लागणे इत्यादी याची कारणे आहेत. कुटुंबातील सदस्य ५० वर्षांहून कमी वयात कोलन, स्तन, प्रोस्टेटच्या कर्करोगापासून पीडित असल्यास या कर्करोगाची तपासणी २५ ते ३० वर्षांपासूनच करावी.