Site icon sunflower hospital nagpur

टीबीबद्दल गैरसमज, समज

टीबीचा नायनाट होतो का ?

टीबी अजून संपलेला नाही. दरवर्षी क्षयरोगाचे लाखो रुग्ण नोंदवले जातात आणि मोठ्या संख्येने मृत्यूही होतात. क्षयरोगाने ग्रस्त असलेले बरेच लोक याला एक काळिमा मानतात आणि निदान व उपचार लपवतात.

एकदा टीबीची लस घेतली की, मग टीबी होत नाही का ?

बीसीजी लस पहिल्यांदा १९२१ मध्ये पॅरिसमध्ये मनुष्यांना देण्यात आली. ही लस अर्भक आणि बालमृत्यू आणि गंभीर क्षयरोगामुळे होणारे अपंगत्व यांपासून काही प्रमाणात संरक्षण प्रदान करते. क्षयरोगाचा प्रसार रोखण्यास मदत करू शकते. मात्र, ही लस फुप्फुसाचा क्षयरोग टाळू शकत नाही.

क्षयरोगातून बरे झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा टीबी होऊ शकतो का ?

गोवर आणि कांजिण्यांसारखा काही आजार झाल्यास त्यापासून आजीवन संरक्षण मिळते; परंतु एकदा का क्षयरोग झाला की, संसर्ग आणि रोगापासून पूर्णपणे सुरक्षित राहत नाही.

क्षयरोग फक्त गरिबीमुळे होतो का ?

गरिबीमुळे क्षयरोगाचा धोका वाढतो; पण त्यामुळे क्षयरोग होत नाही. हा आजार बॅक्टेरियामुळे होतो. प्रभावी अंमलबजावणीला प्राधान्य दिल्यास गरीब देशांमध्येही क्षयरोग दूर करता येतो. क्षयरोग फक्त गरीब आणि वंचितांना प्रभावित करतो, हे एक मिथक आहे. याचा परिणाम आपल्या समाजातील सर्व घटकांवर होत आहे. दीर्घकाळ ताप, वजन कमी होणे, रात्री घाम येणे आणि दीर्घकाळापर्यंत खोकला ही त्याची प्रारंभिक लक्षणे आहेत. भारतीय महिलांमध्ये वंध्यत्वाचे हे एक कारण ठरत आहे. मधुमेह आणि एचआयव्ही संसर्ग असलेल्या लोकांमध्ये दीर्घकालीन संसर्गाचे एक सामान्य कारण आहे.

क्षयरोगाचा परिणाम फक्त फुप्फुसांवर होतो का ?

क्षयरोग हा केस आणि नखे वगळता शरीराच्या सर्व भागांवर परिणाम करतो. मेंदू, डोळे, लिम्फ नोड्स, आतडे, हाडे, सांधे, त्वचा, हृदय आणि पाठीचा कणा यांचा क्षयरोग सामान्यतः दिसून येतो.

क्षयरोगविरोधी औषधांमुळे गंभीर दुष्परिणाम होतात का ?

जर औषधोपचाराचा योग्य पाठपुरावा केला आणि वेळोवेळी रक्त तपासणी केली, तर दुष्परिणामाचे निदान होऊन त्वरित आणि पुरेसे व्यवस्थापन केले जाऊ शकते. क्षयरोग प्रतिबंधक औषधे महाग नाहीत. उपचारांचा खर्च सरकार उचलते. टीबी हा दीर्घकालीन संसर्ग आहे आणि त्यासाठी किमान ६ ते ९ महिने नियमित, अखंड उपचार आवश्यक आहेत. शतकानुशतके प्रभावित करणाऱ्या क्षयरोगाला दूर ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे.

Exit mobile version