Site icon sunflower hospital nagpur

वाढते ‘सर्व्हायकल स्पॉण्डिलायसिस’ जाणून घ्या

आधुनिक जीवनशैलीमुळे मान आणि खान्देदुखीची लक्षणे वाढत आहेत. यात ‘सहायकल स्पॉण्डिलायसिस’, ज्याला मानेचा संधिवातदेखील म्हणतात, हा आजार वाढताना दिसून येत आहे. तुमच्या मानेच्या मणक्यामध्ये झीज झाल्याचे हे यामागील कारण असते. मानेचे योग्य व्यायाम आणि जीवनशैलीतील बदल केल्यास आराम मिळू शकतो. डॉक्टर हा आजार पूर्णपणे बरा करू शकत नाहीत; परंतु त्याची गंभीरता रोखू शकतात.

सहायकल स्पॉण्डिलायसिस म्हणजे काय ?

मानेमध्ये सात लहान मणके असतात, ते एकावर एक संरेखित असतात आणि त्यांच्या दरम्यान एक स्पंजयुक्त पदार्थ म्हणजे गादी असते. ज्याला ‘इंटरव्हर्टेब्रल डिस्क’ म्हणतात. वाढत्या वयानुसार या लहान मणक्यांमध्ये काही बदल होतात, जी या आजाराची लक्षणे आहेत. या बदलांमध्ये ‘डीजनरेटिव्ह डिस्क डीसीज’, ‘हर्निएटेड डिस्क्स’, ‘ऑस्टियोआर्थरायटीस’, ‘बोन स्पर्स’ आणि ‘स्पायनल स्टेनोसिस’ आजारांचा समावेश होतो.

सव्र्व्हायकल स्पॉण्डिलायसिस का होतो ?

वाढत्या वयानुसार सव्र्व्हायकल स्पॉण्डिलायसिस होतो. वय ६० वर्षे आणि त्याहून अधिक झाले असल्यास, धूम्रपानाचे व्यसन असल्यास जास्त वेळ वर किंवा खाली पहाण्याचे काम करीत असल्यास, जडवस्तू उचलण्यासाठी तुमच्या मानेवर दबाव येत असल्यास, कौटुंबिक इतिहास असल्यास आणि मानेच्या दुखापतीचा इतिहास असल्यास हा आजार होऊ शकतो.

सर्व्हायकल स्पॉण्डिलायसिस लक्षणे काय आहेत ?

सर्व्हायकल स्पॉण्डिलायसिस कोणत्याही लक्षणांशिवायदेखील होऊ शकतो. तरीसुद्धा लक्षणांमध्ये मान दुखणे, मान कडक होणे, मानेमध्ये गाठी येणे, चक्कर येणे आणि डोकेदुखी आदींचा समावेश असू शकतो. जेव्हा तुम्ही मान हलवता तेव्हा आवाज येऊ शकतो. पाठदुखी, खांदा दुखणे, खांदे, हात आणि हातांमध्ये मुंग्या येणे हीसुद्धा काही सामान्य लक्षणे आहेत.

सहायकल स्पॉण्डिलायसिस टाळता येतो का ?

सर्व्हायकल स्पॉण्डिलायसिस टाळता येत नाही; पण काही उपाय करून त्याचे धोके कमी करता येतात. जर तुम्हाला संगणकासमोर बराच वेळ बसावे लागत असेल तर योग्य मुद्रेत बसा. मान आणि खांद्याच्या स्नायूंसाठी नियमितपणे स्ट्रेचिंग सारखे व्यायाम करा.

सव्हायकल स्पॉण्डिलायसिसचे निदान कसे केले जाते?

रुग्णाच्या मानेच्या हालचाली तपासून डॉक्टर निदान करू शकतात. या शिवाय, रिफ्लेक्सेस आणि स्नायूंच्या ताकदीचे मूल्यांकन केले जाते. तुमच्या हालचालींवरून पाठीच्या कण्यावर दबाव पडतो आहे की नाही यातूनही कळते. मानेच्या एक्स-रेद्वारे या आजाराचे निदान होते. काही प्रकरणांमध्ये, मानेचा एमआरआय, मानेचा सीटी स्कॅन आणि काही मज्जातंतूंच्या कार्याच्या चाचण्याही केल्या जातात.

उपचार काय?

सहायकल स्पॉण्डिलायसिसवरील उपचार ह समस्येच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. वेदना टाळण्यासाठी, दैनंदिन कार्य चालू राहण्यासाठी, पाठीचा कणा आणि मज्जातंतूंना कायमस्वरूपी इजा रोखण्यासाठी डॉक्टरांचे उद्दिष्ट असते. फिजिकल थेरपी, वेदना कमी करणारे, स्नायू शिथिल करणारे औषधी दिली जाऊ शकतात. न्यूरोलॉजिकल लक्षणे असल्यास, म्हणजे हात किंवा पायात अशक्तपणा आल्यास शस्त्रक्रियाची गरज पडते.

Exit mobile version