जीवनशैलीतील बदलांमुळे स्तनाचा कर्करोगाचा धोका कमी होतो?
होय, योग्य जीवनशैली आत्मसात केल्यास स्तनाचा कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. सोबतच अल्कोहोलचे सेवन कमी करायला हवे. अगदी कमी प्रमाणातही अल्कोहोल प्यायल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. कॅलरीजचे सेवन कमी करायला हवे. नियमित व्यायाम करून वजन नियंत्रणात ठेवावे. स्तनाचा कर्करोग रोखण्यासाठी स्तनपानाची भूमिकाही महत्त्वाची असते. रजोनिवृत्तीनंतर हार्मोन थेरपी मर्यादित करायला हवी. उच्च जोखीम असलेल्या महिलांसाठी ‘टॅमॉक्सिफेन’ किंवा ‘रॅलोक्सिफेन’ची शिफारस केली जाते.
स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती?
अंडरआर्म किंवा स्तनामध्ये नवीन गाठ, स्तनाचा भाग घट्ट होणे किंवा सूज येणे, स्तनाच्या त्वचेमध्ये जळजळ वाटणे किंवा खड्डा पडणे, स्तनाग्र ताणल्यासारखे होणे, वेदना होणे व लालसरपणा येणे ही काही सुरुवातीची लक्षणे आहेत.
स्तनाच्या कर्करोगासाठी जोखीम घटक कोणते?
स्तनाचा कर्करोगाचा वयानुसार धोका वाढतो. एका स्तनामध्ये कर्करोग असल्यास दुसऱ्या स्तनामध्ये कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. कुटुंबातील ४५ वर्षापेक्षा कमी वयाच्या कोणत्याही महिलेला स्तनाचा कर्करोग असल्यास, कुटुंबातील इतर महिला सदस्यांना तो होण्याचा धोका वाढतो. स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, मेटास्टॅटिक प्रोस्टेट स्तनाचा कर्करोगाचा वयानुसार कर्करोग आणि स्वादुपिंडाचा कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असल्यामुळेसुद्धा धोका वाढू शकतो.
लवकर मासिक पाळी आणि उशिरा रजोनिवृत्तीचा काय परिणाम होतो?
वयाच्या ११ किंवा १२ व्या वर्षांपूर्वी मासिक पाळी सुरू झाल्यास किंवा वय ५५ नंतर रजोनिवृत्ती झाल्यास, स्तनाच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये थोडीशी वाढ होते. कारण स्तनाच्या ऊतींना दीर्घ कालावधीसाठी इस्ट्रोजेनचा संपर्क येतो.
उशिरा गर्भधारणा करण्यात काही नुकसान आहे का ?
वयाच्या ३५ नंतर पहिली गर्भधारणा झाल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. लवकर गर्भधारणेमुळे स्तनाचा कर्करोग टाळता येतो.
स्तनाचा कर्करोग होण्यासाठी हे सर्व जोखीम घटक असणे आवश्यक आहे का?
लक्षात ठेवा की, ज्या स्त्रियांमध्ये जोखीम घटक नसले तरी त्यांना स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. स्तनाच्या कर्करोगाचे कोणतेही निश्चित कारण नाही. महिलांना त्यांच्या स्तनांमध्ये होणाऱ्या बदलांची जाणीव असणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी नियमित स्तन तपासणी आणि मॅमोग्रामची शिफारस केली पाहिजे. मॅमोग्राम हा स्तनाचा एक्स-रे आहे. जीवनशैलीत काही बदल करून स्तनाच्या कर्करोगाचा धोका निश्चितपणे कमी करता येतो, स्तनांची नियमित तपासणी, मॅमोग्राम आणि बीआरसीए जनुकातील उत्परिवर्तनाची माहिती या रोगाबद्दल अधिक अचूकपणे जाणून घेण्यास मदत करू शकते.